■ सिंदेवाही पोलिसांनी आणले उघडकीस
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही :- तालुक्यातील देलनवाडी परिसरात काही दिवसापूर्वी बनावटी अपघात दाखवून मुलाने ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे उपचाराकरिता त्याचे वडिल अरुण गोपाळा गोबाडे वय ५० मु.देलनवाडी यास आणले होते. चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयात येथे पुढील उपचाराकरिता हलविले असता उपचारादरम्यान अरुण गोबाडे यांचा मृत्यु झाला. काही दिवसानंतर पोस्टमोर्टम रिपोर्ट मध्ये डोक्याला मार असल्याचे नमूद केल्याचे दिसले. त्या आधारावर आरोपी विवेक अरुण गोबाडे (२६) रा.देलनवाडी याने मृतक वडील अरुण गोबाडे याला घरघुती भांडणावरून मुलगा विवेक गोबाडे याला राग आल्याने रागाच्या भरात वडील अरुण गोबाडे यास जीवेमारण्याच्या उद्देश्याने समोर असलेल्या बैलबंडी ची उभारी काढून हातात घेऊन विवेक ने वडीलांच्या डोक्यावर मारले त्यात वडील अरुण गोबाडे हे जखमी झाले होते. आणि उपचारादरम्यान मरण पावले. असुन सदर सत्य बाब लपवुन ठेऊन कोणालाही न सांगता मृत पावलेल्या वडील अरुण गोबाडे याची अंतविधी करून मुलगा विवेक गोबाडे याने पुरावा नष्ट केला तसेच विवेक ने घडलेल्या घटनेबाबत रुग्णालयात खोटे सांगितले होते. सिंदेवाही पोलिसांनी चौकशी आहवालावरून सदर गुन्हा नोंद करून तपासात घेतला होता. मुलगा विवेक गोबाडे याची सखोल चौकशी केली असता. त्यानुसार हि बाब दिनांक २८ जुलै बुधवार ला सिंदेवाही पोलिसांना माहित झाले असता आरोपी विवेक अरुण गोबाडे (२६) रा. देलनवाडी ता. सिंदेवाही यास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली व त्याची चौकशी केली असता आरोपीने रागाच्या भरात वडिलाचा खून केल्याची कबुली केली. यावरून पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे अप क्र. ३११/२०२१ कलम ३०२, २०१, १७७ भारतीय दंड विधाना नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे , उपविभागीय पोलिस अधिकारी अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाहीचे ठाणेदार योगेश घारे यांनी कारवाई केली असून पुढील तपास पोलीस ठाणेदार घारे करीत आहेत.