• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    भाजपा जिल्हा महिला आघाडीची बैठक पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत संपन्न

    चंद्रपुर :- भाजपा जिल्हा महिला आघाडीच्या बैठकीत पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज जी अहीर यांची उपस्थिती होती. महिलांचे भाजपासाठी मोठे योगदान राहिलेलेच आहे, त्यापेक्षाही जास्त योगदान महिलांनी भाजपाचे संघटन व बूथ रचनेच्या कार्यात द्यावे असे आवाहन यावेळी हंसराज अहीर यांनी केले.

    भाजपमध्ये पुरुषांबरोबरच महिलांचेही सहकार्य असावे आणि राजकारणाच्या मंचावर महिलांचे बरोबरीचे योगदान असावे असे भाजपचे धोरण आहे. राजकीय मंचावर महिलांना भाजपने सन्मान दिला. मा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात महिला मंत्री आहेत. भारतात सर्वात जास्त सदस्य असलेला पक्ष म्हणून भाजप १ नंबरवर आहे आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहे या दोन्ही बाजू आपल्यासाठी अभिमानास्पद व कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या असतांना महिलांनी दिलेल्या कार्यामध्ये अग्रेसर राहून विविध जाती पंतांतील महिला जास्तीत जास्त संख्येत भाजपाशी जोडाव्या असे आवाहन हंसराज जी अहीर यांनी महिलांना बैठकीत बोलतांना केले. यावेळी देवराव भोंगळे, नामदेव डाहुले, अलका आत्राम, वनिता कानडे, ज्योतीताई भुते, रत्नमाला भोयर, शोभा पिदूरकर व अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.