तळोधी बा :- सतत ३ दिवसापासून दारू पिऊन दारूच्या नशेतच विषारी औषध प्राशन करून सावर्ला शेत शिवारात तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकिस आली.मृत तरुणाचे नाव आशीष मारोती बोरकर (वय 30) असे असून तो नागभीड तालुक्यातील गंगासागर हेटी येथे सासुरवाडीला पत्नीसह घर जावई म्हणून राहत होता.
आशिष बोरकर ला दररोज दारू पिण्याची सवय जळली होती. मागील तीन दिवसापासून तो दारूच्या आहारी जाऊन सतत दारू पीत होता. दरम्यान नशेतच त्याने विषारी औषध प्राशन करून सावर्ला मार्गालगतच्या सावर्ला शेतशिवारात आत्महत्या केली. त्याच्या मागे पत्नी, आणि दोन मुलीं असा परिवार आहे. तळोधी पोलिसांनी पंचनामा करून मृत देह पोस्टमार्टम साठी नागभीड येथे नेण्यात आले.
आत्महेत्येचे नेमके कारण कळले नसून अधिक तपास तळोधी पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र खैरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार पठाण, पोलीस हवालदार देव्हारे,रामटेके करीत आहेत.