• Advertisement
 • Contact
More

  दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीस शिरपूर पोलिसांनी केली अटक

    शालिवाना बंद कारखान्यातील घटना

  घुग्घुस येथील भंगार चोरांचा समावेश

  दिनांक 11/9/2021 रोजी रात्री शिंदोला ते कळमना रस्त्यावर शालिवाहना बंद कारखान्यात तांबा चोरी करण्याच्या उद्देशाने येत असल्याची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच कंपनी परिसरात सापळा रचला एक पांढऱ्या रंगाचे चार चाकी वाहन तिथे आले व तीन इसम कंपनीत घुसले अत्यंत शिताफीने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

  आरोपी मोहसीन निसार शेख (23) शाहरुख शहादतुल्ला कुरेशी (24) ताहीद अहमद कुरेशी (22) सर्व राहणार घुग्गुस त्यांच्या ताब्यात लोखंडी कोयता कुऱ्हाड दोन लोखंडी आरी पत्ते मोबाईल असा एकूण 27,100 रुपयाचा एवज हस्तगत करण्यात आला यातील अजय नायक, जॉनी, कौशल असे फरार आरोपीचे नाव आहे
  ही कारवाई शिरपूरचे ठाणेदार सचिन लुले, राम कांडुरे, प्रमोद जुनूनकर, गुणवंत पाटील, गंगाधर घोडाम, अनिल सुरपाम, आशिष टेकाडे, अभिजित कोषटवार यांनी केली.

  नौशाद शेख, घुग्घुस प्रतिनिधि सर्च टि, व्ही,