• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    विजेच्या धक्क्याने मुलीचा मृत्यू

    चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील शेगाव येथील पोलिस हद्दीत 17 जुलैला सकाळच्या सुमारास वीज उपकरण चालू करण्यास गेलेल्या वैष्णवी गजानन वरखंडे 14 हिचा मृत्यू झाला.
    सकाळच्या सुमारास वैष्णवी ही घरातील फरशी पुसण्यात व्यस्त होती. फरशी लवकर वाळावी, याठी पंख्याची पिन लावण्यास गेली. पिन तुटून असल्याचे लक्ष्यात न आल्याने तिला विद्युत प्रवाहाचा जबर झटका बसला. त्यात तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर मुलीला उपजिल्हा रुग्णालयात वरोरा येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. पुढील तपास शेगाव पोलिस करीत आहे.