• Advertisement
  • Contact
More

    अकरावी CET प्रवेश परीक्षेची वेबसाईट बंद

    दहावीचा निकाल जाहीर झाला असून इयत्ता अकरावी सीईटीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, तांत्रिक बाबींच्या कारणास्तव सीईटीची वेबसाईट तूर्तास बंद ठेवण्यात आली आहे. प्रवेशप्रक्रिया पूर्ववत सुरू झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना सूचित करण्यात येणार आहे. तसेच सीईटी परीक्षेची नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी देण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.
    अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचे आयोजन २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत करण्यात आले आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या वेबसाईटवरून अर्ज करण्याची सुविधा २६ जुलै अखेरीस उपलब्ध करुन देण्यात आली होती.