ब्रम्हपुरी तालुक्यातील एकरा येथील शेतकरी हरी मूरखे सकाळी शेतीकामासाठी शेतात गेले असता विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्यांचा शेतातच मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी 6-30 वाजता घडली.
हरि मूरखे नेहमीप्रमाणे शेतात पिक पाहणी व शेतकाम करण्याकरिता गेले असता त्यांच्या शेताजवळील खांब वाकला असल्याने त्याची विद्युत तार खाली पडली होती ती हरि मूरखे यांना दिसली नाही व त्याला स्पर्श झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. काही गावकर्यांच्या ही बाब लक्षात आली त्यांनी लगेच पोलिस पाटीलांना माहिती दिली.
त्यांच्या निधनाने गावात शोककला पसरली आहे.