• Advertisement
  • Contact
More

    शेतमजुराची गळफास घेऊनआत्महत्या राजूरा तालुक्यातील हिरापुर येथील घटना


    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील हिरापूर गावात एका शेतमजुराने आत्महत्या केली. विलास रामदास शेरकुरे या (32) असे या मृतकाचे नाव आहे. शेतमजुराने आर्थिक परिस्थितीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळते. या युवक शेतमजुराच्या आत्महत्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    विलास शेरकुरे या शेतमजुराच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असून त्याची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे बुधवारी रात्री त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.