• Advertisement
  • Contact
More

    शेतात चिखल करताना ट्रक्टर पलटून चालकाचा मृत्यु

    कुरखेडा :- गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील चिनेगाव येथे शेतशिवारात रोवणीचा कामाकरीता शेतात चिखल करताना ट्रक्टर पलटून झालेल्या अपघातात ट्रक्टर चालक जागीच ठार झाल्याची घटणा आज दि १८ जूलै रविवार रोजी दूपारी १२ वाजेचा सूमारास घडली
    मृतक ट्रक्टर चालकाचे नाव अक्षय दयाराम जूमनाके वय २४ असे आहे
    तो स्वमालकीचा ट्रक्टरने गावातीलच रामकृष्ण जूमनाके यांचा शेतात रोवणी करीता चिखल करीत होता मात्र आज दूपारी १२ वाजेचा सूमारास एका बांधीचा चिखल झाल्यावर दूसर्या बांधीत ट्रक्टर नेत असताना धूर्यावर ट्रक्टर अनियंत्रित होत पलटल्याने ट्रक्टर खाली दबत त्याचा घटणास्थळीच मृत्यु झाला .