• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  धानोरा येथील वर्धा नदीत दोन मृतदेह आढळले

  घुग्घुस :- गत 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चंद्रपुर जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरातील सर्व नदी नाले ओसंडून वाहु लागले, बऱ्याच घरांची पडझड झाली, शेती पाण्याखाली आली.

  शनिवार 24 जुलै रोजी 11:30 वाजता धानोरा गावाजवळील वर्धा नदीत शेतात काम करणाऱ्या नागरिकांना आढळले. नागरिकांद्वारे घुग्घुस पोलिसांना माहिती देण्यात आली.
  पोहवा. उमाकांत गौरकार, निलेश तुमसरे, सचिन वासाडे यांनी घटना स्थळी जाऊन पंचनाम केले. मृतकांची ओळख पटली नसून मृतदेह शवविच्छेदना साठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे.
  पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.