• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  महाराष्ट्रातील पूरग्रस्त नागरिकांसाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या माध्यमातून मदतीचे आवाहन

  चंद्रपुर :- निसर्गाच्या अवकृपेने अतिवृष्टीमुळे कोकण, सांगली, कोल्हापूर या भागात भयंकर पुरस्थिती उदभवली आहे. गंगा माईने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी दिलेले आहेत
  आपले महाराष्ट्रातील बांधव प्रचंड दुःखात आहे त्यांना साथ देण्यासाठी, त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्षा आदरणीय संध्या ताई सवालाखे यांनी मदतीसाठी आवाहन केले आहे.

  त्याला साथ म्हणून आम्ही देखील चंद्रपूर महिला काँग्रेस च्या माध्यमातून खारीचा वाटा उलणार आहोत त्या साठी शहर व जिल्हातील सर्व सामाजिक संस्था, काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी यांना मी आवाहन करते की, त्यांनी मदतीसाठी पुढे येऊन सहकार्य करावे. यासाठी आपण आपल्या घरील जुन्या बेडशीट्स, शर्ट पॅन्ट, साड्या, लहान मुलांचे कपडे, पेटीकोट, गाऊन, खराटे, इन्स्टंट फूड, टूथ पेस्ट, टूथ ब्रश, महिलां साठी सेनेटरी नॅपकिन्स, अंतर्वस्त्रे , बेसिक औषधे जसे की सर्दी, खोकला ताप या साठी उपयोगात येतात, फिनाईल च्या बॉटल इत्यादी साहित्याची जमवाजमव करून ते साहित्य महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्षा आदरणीय संध्या ताई सवालाखे यांच्या कडे पाठवण्यात येणार आहे.

  येत्या गुरुवार पर्यँत हे साहित्य जमा करायचे आहे त्या साठी सहकार्य करून आपल्या सर्व पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा एक हात पुढे करूया कृपया खालील नंम्बर वर संपर्क साधून हे साहित्य पोहचावे किंवा संपर्क साधावा आम्ही स्वतः हे साहित्य घ्यायला आपल्या दरी येऊ.
  नम्रता आचार्य ठेमस्कर       सुनीता धोटे
  9423669302                9665729722

  शीतल काटकर                   स्वाती त्रिवेदी
  8262018463                9022787308

  हर्षा चांदेकर                     लता बारापात्रे
  7972275154               9130340661

  Leave a reply

  Please enter your comment!
  Please enter your name here