• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    शेतकरी आत्महत्येची 23 प्रकरणे मदतीकरीता निकाली –  अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी घेतला आढावा

    जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीच्या बैठकीमध्ये शेतकरी आत्महत्येच्या एकूण 27 प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत 23 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून 3 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली आहे, तर उर्वरित 1 प्रकरण फेरतपासणीसाठी प्रलंबित ठेवण्यात आले आहे.

    शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला 23 जानेवारी 2006 च्या शासन निर्णयाद्वारे आर्थिक मदत देण्यात येते. जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्येच्या 27  प्रकरणांवर चर्चा झाली. यापैकी 23 प्रकरणे पात्र करून मदतीकरीता निकाली काढण्यात आली तर 3 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली. उर्वरित 1 प्रकरणे समितीने फेरतपासणी साठी प्रलंबित ठेवले आहे