• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  चंद्रपुर शहरात पुन्हा गैंगवॉर। पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी

  चंद्रपुर शहरात पुन्हा गैंगवॉर पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी
  चंद्रपुर शहरातील रघुवंशी कॉम्पेक्स गोळीबार प्रकरण घडले संशयित आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले परंतु, हे प्रकरण संपत नाही- तेच पुन्हा गुंडागर्दी चे प्रकरण गजबजलेल्या वरोरा नाका चौकात घडले-
  सविस्तर वृत्त असे की गुरूवार १४ जुलै ला भर दुपारी वरोरा नाका चौकात १०,१२ युवकांनी वरोरा नाका चौकातील एका पानठेला व्यावसायिकाला बेदम मारहाण केली- युवकाला मारहाण होत असताना,बरेच लोक जमा झाले.परंतु सर्वानी फक्त बघ्याची भूमिका घेतली- त्या युवकाला सोडविण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही-
  या मारहाणीची भनक वरोरा नाका चौकात स्थित, श्रमिक पत्रकार संघाचे कार्यालयात लागली- काही पत्रकारांनी विडियो शूटिंग व फोटो काढण्याचा प्रयत्न करीत असताना. गुंड युवकांची नजर पत्रकार भवनाकडे पडली मग, त्यांचा घोळका पत्रकाराकडे वळला व पत्रकार प्रकाश हांडे यांना ‘आमचा विडियो काढलास तर,कापून टाकू’ अशी धमकी देत.त्यांच्या हातातला मोबाईल हिसकविण्याचा प्रयत्न केला- काही नागरिकांनी मध्यस्ती केली व लगेच रामनगर पोलिसांना फोन केला
  मात्र पोलिसांनी त्या ठिकाणी यायला बराच विलंब लावला- युवकाला मारहाण केल्यावर सुद्धा 10 ते 15 मिनिटं थांबुन, ते सर्व युवक घटनास्थळावरून पसार झाले. पोलीस आले मात्र त्यांना कुणीही आरोपी युवक घटनास्थळी मिळाले नाही.

  पत्रकार प्रकाश हांडे यांनी स्वतः रामनगर पोलीस ठाणे गाठुन, आरोपीं विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
  वृत्त लिहेपर्यंत कुणालाही अटक झाली नाही.
  स्थानिक नागरिकांच्या प्राथमिक माहिती नुसार, जर रामनगर पोलीस लवकर घटनास्थळी पोहोचले असते तर, आरोपींना अटक करणे शक्य झाले असते. दोन दिवसांआधी शहरात गोळीबार झाल्याचे प्रकरण ताजे असताना सुद्धा पोलीस तत्पर नाही. असा सुर स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे-
  सायंकाळच्या सुमारास ते सर्व आरोपी युवक पुन्हा, वरोरा नाका चौकात जमा झाले होते. त्यावेळी सुद्धा पोलिसांना फोन करण्यात आला. मात्र, यावेळी पोलीस आलेच नाही.
  गोळीबार च्या घटनेनंतर, आता हल्ला करणारे युवक सजग झाले आहे. मारहाण करणारऱ्या आरोपीनी काही युवक नागरिकांच्या मध्ये कुणीही व्हिडिओ किंवा फोटो न काढावे यासाठी उभे केले होते.
  पोलिसांच्या विलंबाने आज युवकाचा बळी गेला असता. जर वेळीच मारहाण करणाऱ्या युवकांचा घोळका पत्रकारांच्या दिशेने गेला नसता. शहरातील गुन्हेगारीवर आता पोलिसांनी कठोरतेने वागून संपूर्ण दादागिरी ठेचायला हवी नाहीतर, चंद्रपूर कधी गँग ऑफ वासेपुर होणार याला वेळ लागणार नाही.