■ पोलिस तपासात गुंतले
चंद्रपुर :- जिल्ह्यात दारूबंदी हटविताच गुन्हेगारीच्या दुनियेत दिवसेंदिवस काही प्रमाणात खळबळ उडाली आहे, गोळीबार, तलवारबाजी, भांडणे, देशी बनावटीच्या पिस्तूल दाखवून पेट्रोल पंपांवर लुटणे,चोरी चे वाढते प्रमाण अचानक अश्या वाढत्या घटनांवरून पोलिसांची जणु झोपच उडाली आहे,
परंतु पोलिसांपासून गुन्हेगार फार काळ लपु शकत नाही.
बल्लारपूरच्या बालाजी वॉर्डात पोलिसांना काही तरुण तलवारी दाखवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली, पोलिस या गुंडाचा शोध घेत होते की,
रात्री 9.30 वाजता महाराणा प्रताप वार्डातिल बीटीएस प्लॉटमध्ये राहणारा संदीप उर्फ बोगा सुरेश दवडेवार (वय 27) याला तलवारीने काही अज्ञात हल्लेखोरांनी गंभीर जखमी केल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.
पोलिसांनी आपल्या गुप्तहेर च्या माहिती नुसार विनोद उर्फ चंटी कोंडावार (वय २८ वर्ष) राहनार महाराणा प्रताप वार्ड येथील घरातून अटक करुन कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी हवालात मध्ये बंद करण्यात आले इतर तीन फरार हल्लेखोरांचा शोध बल्लारपुर पोलीस घेत आहेत.