• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    शोकाकुल लष्करे परिवाराची आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भेट घेऊन केले सांत्वन

    चंद्रपुर :- दुर्गापूर येथे १२ जुलै रोजी जनरेटर मधील गॅस गळतीमुळे रमेश लष्करे यांच्यासह त्यांच्या कुटूंबातील सहा जणांचा दुर्देवी मृत्यु झाल्याच्या घटनेसंदर्भात माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा पदाधिका-यांसह लष्करे कुटूंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला. यावेळी मृतक रमेश लष्करे यांची आई श्रीमती नागम्मा लष्करे व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

    या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन अर्थसहाय्य मंजूर करावे या मागणीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेत निवेदन सादर केले. मृतकांच्या कुटूंबियांना १० लाख रू. चे अर्थसहाय्य मिळण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री सचिवालयाला सादर करण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिका यांना केल्या. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी त्वरीत प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले.