• Advertisement
  • Contact
More

    घुग्गुस शहरात, एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

    घुग्गुस शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून शालीकराम नगर येथे आणखी एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे.संतोष बाहिर वर्मा असे 26 वर्षीय मृतकाचे नाव आहे.मृत युवक हा गोलछा कंपनीत वाहन चालक म्हणून कार्यरत होता. या घटनेची माहिती घुग्गुस पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला तसेच मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. दरम्यान घुग्गुस शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून सोमवारी रात्री 28 वर्षीय विवाहित युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच आज पहाटे आणखी एका युवकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.