• Advertisement
 • Contact
More

  घुग्घुस नगरपरिषदेला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करा.

  उच्चस्तरीय चौकशी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत भाजपचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही – विवेक बोढे

           आज सकाळच्या सुमारास घुग्घुस नगरपरिषदेच्या गोडाऊनला आग लागली. या आगीत नगरपरिषदेच्या मालकीचे अनेक साहित्य जळाले. नगरपरिषदेमध्ये सि. सि. टी. व्ही. कॅमेरे लावलेले आहेत. रात्रपाळीत कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. मग हि आग कशामुळे लागली याची उच्चस्तरित चौकशी होणे अत्यंत आवश्यकता आहे.
  
  जोपर्यंत सखोल चौकशी होणार नाही तोपर्यंत भाजपचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही अशी भावना विवेक बोढे यांनी बोलून दाखवली.
  
  या प्रसंगी माजी उपसरपंच संजय तिवारी माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहणे, अमोल थेरे, रत्नेश सिंह, प्रवीण सोदारी, हेमंत पाझारे, रज्जाक शेख, पांडुरंग थेरे, विनोद जिंजर्ला, कोमल ठाकरे, नितीन कटारे, सतीश कामातवार, दशरथ कांबळे तथा अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

  नौशाद शेख घुग्घुस, प्रतिनिधि- सर्च टि, व्ही,