शनिवार 28 ऑगस्ट रोजी घुग्घुस पोलीस स्टेशन येथे आगामी गणेश उत्सवा निमित्त शांतता कमेटीची बैठक पार पडली.
याप्रसंगी बोलताना घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्शीया जुही म्हणाल्या गणेश उत्सव महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार साजरा करावा. आरोग्याची दक्षता घेऊन साजरा करावे कोविड नियमाचे पालन करावे कमीत कमी लोकांत सण साजरा करता येईल, हे पाहून पर्यावरण पूरक बाप्पा बसवायचा आहे. पीओपीचा वापर करू नये ईको फ्रेंडली बाप्पा बसवायचा आहे.
त्याआधी घुग्घुस नगर परिषदेचे परवानगी व पोलीस स्टेशनची परवानगी घेणे आवश्यक आहे. 24 तासाच्या आत बाप्पा बसविण्याची परवानगी देण्यात येईल नियमांचे उल्लंघन न करता एकात्मतेने सण साजरा करावा.
यावेळी पो.नि.राहुल गांगुर्डे, पो.उपनिरीक्षक किशोर मानकर, मनीषा जगताप, दिनेश वाकडे व शांतता कमेटीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.
नौशाद शेख घुग्घुस: प्रतिनिधि सर्च टि, व्ही,