• Advertisement
 • Contact
More

  घुग्गुस येथे वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधनाचा कार्यक्रम

  आज दि. 08/09/2021 रोजी मा.डॉ भूषणकुमार उपाध्याय साहेब, अपर पोलीस महासंचालक(वा)महाराष्ट्र राज्य मुंबई, तसेच मा. श्वेता खेडकर मॅडम पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग, नागपूर मा. संजय पांडे साहेब,पोलीस उप अधीक्षक प्रादेशिक विभाग, नागपूर व पोलीस निरीक्षक श्रीमती वैरागडे मॅडम, नागपूर विभाग यांचे मार्गदर्शनखाली म.पो.केंद्र हद्दीत SH 07वर पडोली ते वणी रोड वर घुग्घुस येथे वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधनाचा कार्यक्रम पो.अधिकारी व पो. अंमलदार यांच्याकडून घेण्यात आला आहे त्या वेळी खालील वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
  1) मो.सा. चालवितांना नेहमी हेल्मेट चा वापर करावा.
  2) मो.सा.चालवितांना मोबाईल फोनचा वापर टाळावा
  3) गाडीचे कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावी.
  4) टिबल सिट प्रवास करु नये.
  5) दारू पिऊन वाहन चालवू नये.
  6) समोरील वाहन केंव्हा पण थांबू शकतो म्हणून सुरक्षित अंतर ठेवून वाहन चालवावे.
  7) ओव्हरटेक करतांना समोरील रोड क्लियर असल्याबाबत खात्री करूनच ओव्हरटेक करावे.
  8) मो.सा.चालविताना वेग मर्यादाचे पालन करावे
  9)विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये.
  10)अपघात समयी मदत करा
  तसेच मृत्युंजय दूत संकल्पनेची व interseptor ची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दरम्यान 55 ते 60 मो. सा. चालक व प्रवाशी हजर होते.
  करिता सविनय सादर

  पो.उपनि.विनोद कुमार तिवारी
    म.पो.केंद्र चंद्रपुर

  नौशाद शेख घुग्घुस, प्रतिनिधि- सर्च टि, व्ही,