• Advertisement
  • Contact
More

    घुग्गुस येथील, विवाहित युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

    घुग्गुस येथील विद्या टॉकीज जवळ राहणाऱ्या 28 वर्षीय विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली आहे.अनिकेत नागेश नलभोगा असे मृत युवकाचे नाव आहे.याची माहिती घुग्गुस पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.अनिकेत ने आत्महत्या कोणत्या कारणाने केली याची माहिती अद्याप अस्पष्ट असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे. दरम्यान अनिकेत हा विवाहित असल्याने त्यांना लहान मूल देखील आहेत. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.