• Advertisement
  • Contact
More

    घुग्गुस शहरातून होणारी जड वाहतूक बंद करा, शिवसेनेचे पोलीस निरीक्षकांना निवेदन

    घुग्गुस शहरातून होणारी जड वाहतूक बंद करा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली असून तसे निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे. घुग्गुस शहरातून जड वाहनांद्वारे कोळशाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळं मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कोळशाचा धूर मोठ्या प्रमाणात उडत असल्याने प्रदूषण वाढी सोबतच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोळसा वाहतूक करण्यासाठी जड वाहनांना दुसरा मार्ग उपलब्ध करून दिला असताना सुद्धा घुग्गुस शहरातुनच कोळशाच्या जड वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे घुग्गुस शहरातून होणारी जड वाहतूक बंद करा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली असून तसे निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे. शहरातून जड वाहतूक बंद न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

    नौशाद शेख घुग्घुस, प्रतिनिधि सर्च टि, व्ही,