• Advertisement
 • Contact
More

  घुग्गुस शहरा लगतच घोडा घाट परिसरातील शेतशिवारात वाघाची दहशत

  घुग्गुस शहराला लागून असलेल्या वर्धा नदीच्या घोडा घाट परिसरातील शेतशिवारात वाघाची दहशत निर्माण झाली असून घुग्गुस येथील किशोर पोडे यांच्या जनावरांना वाघाने ठार केल्याची घटना आज गुरुवारी उघडकीस आली आहे. याची माहिती वनविभागाच्या पथकाला देण्यात आली. त्यानंतर वनविभागाने या भागात वाघावर नजर ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.
  घुग्गुस परिसर हा जंगलाने वेढला असून अनेक हिंस्त्र प्राण्यांचा नेहमी वावर असतो, अशातच घोडा घाट परिसरात किशोर पोडे यांच्या जनावरांवर वाघाने ताव मारला. याआधी सुद्धा परिसरातील शेतकऱ्यांना अनेक वेळा वाघाचे दर्शन झाले आहे. तसेच वाघाचे पगमार्क सुद्धा दिसून आले. त्यामुळे
  शेतकरी तसेच नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तसेच परिसरात कॅमेरे लावण्यात आले आहे. वनरक्षक राजेश पाथरडे, भुषण गोधने वनरक्षक, चौधरी, मंगेश, सुनिल,उपरे, सुरेश, उपस्थित होते.

  नौशाद शेख घुग्घुस, प्रतिनिधि सर्च टि, व्ही,