• Advertisement
  • Contact
More

    घुग्गुस शहरात घरफोडीचे सत्र सुरूच, साईनगर वार्डात घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांसह 50 हजारांचा मुद्देमाल लंपास

    घुग्गुस शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून आज गुरुवारी साईनगर वार्डात अज्ञात चोरट्यानी घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांसह 50 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. त्यामुळे घुग्गुस पोलिसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
    शहरातील साईनगर वार्डात राहणारे प्रकाश महादेव होकम हे काही कामानिमित्त 24 ऑगस्टला कुटुंबासाहित हिंगणघाट येथे गेले होते, 26 ऑगस्टला होकम हे परत आल्यावर घरातील सामान अस्तव्यस्त आढळून आले. त्यानंतर त्यांनी अलमारी तपासून बघितली त्यामध्ये ठेवलेली 15 हजारांची रोख रक्कम व 35 हजारांचे सोन्याचे दागिने चोरी गेल्याची बाब होकम यांच्या लक्षात आली.त्यांनी तात्काळ घुगुस पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
    मागील अनेक महिन्यापासून शहरात अनेक भागात चोरी, घरफोडीचे प्रमाण वाढत आहे, पोलीस यंत्रनेणी परिसरात गस्त वाढवावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे.