• Advertisement
 • Contact
More

  घुग्घुस येथील तत्कालीन ग्रामपंचायत सफ़ाई कर्मचाऱ्यांचे किमान वेतनासाठी ठिय्या आंदोलन

  नौशाद शेख, घुग्घुस प्रतिनिधि सर्च टि, व्ही,

  घुग्घुस :- येथील तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी प्रमोद महाजन रंगमंचावर किमान वेतन मिळण्यासाठी शनिवार 10 जुलै रोजी सायंकाळी दरम्यान ठिय्या आंदोलन सुरु केले. तत्कालीन घुग्घुस
  ग्रामपंचायतीचे कर्मचारी गौतम देशकर, आकाश मुरड,लीला झाडे,कमला पोनाळा, बंडू पोहणकर, दिनकर मस्के,सुमित्रा जीवणे,बेबी मुरार, लक्ष्मी येरलेकर, मारोती पाझारे,सुमन गुंडे,कलाबाई कासवटे यांचे 4 लाख 10 हजार 400 रुपयाचे किमान वेतन मिळाले नाही त्यामुळे त्यांनी आपले किमान वेतन मिळण्यासाठी घुग्घुस येथील प्रमोद महाजन रंगमंचावर ठिय्या आंदोलन सुरु केला आहे,
  येथील कर्मचाऱ्यांना किमान वेतन दरा पेक्षा कमी वेतन दराने वेतन दिल्याने निर्धारित वेतन मिळण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त यांचा कडे दावा सादर करण्यात आला होता त्यामुळे 12 कर्मचाऱ्यांचे 4 लाख 10 हजार 400 रुपये देण्याचे आदेश पारित केले होते ते घुग्घुस नगर परिषदे कडून न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी घुग्घुस नगर परिषदेच्या विरोधात ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहें