• Advertisement
  • Contact
More

    घुग्घुस नगर परिषद कार्यालयातून रहिवासी दाखला देण्यास सुरुवात

     भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मागणीला यश

    घुग्घुस प्रतिनिधी नौशाद शेख, सर्च टि, व्ही,

    गुरवार 26 ऑगस्ट रोजी भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्शीया जुही यांना घुग्घुस नगर परिषद कार्यालयातून रहिवासी दाखला देण्यात यावा अशी मागणी निवेदनातून केली होती. त्याअनुषंगाने भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मागणीची तात्काळ दाखल घेत घुग्घुस नगर परिषद कार्यालया तर्फे रहिवासी दाखला देण्यात येत आहे. भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मागणीला यश आल्याने त्यांनी प्रशासनाचे आभार मानले.

      घुग्घुस नगर परिषद कार्यालयातून रहिवासी दाखला देण्यात येत नव्हता त्यामुळे अनेक नागरिकांना व विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असे. 
    
    अनेक नागरिक रहिवासी दाखल्यासाठी कार्यालयात चकरा मारत होते परंतु तो मिळत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
    
       घुग्घुस शहराची लोकसंख्या पन्नास हजाराच्या जवळपास आहे. यापूर्वी घुग्घुस ग्रामपंचायत असतांना रहिवासी दाखला देण्यात येत होते, नगर परिषद झाल्यावर सुद्धा प्रशासकांमार्फत  रहिवासी दाखला देण्यात येत होता. परंतु मुख्याधिकारी आल्यापासून राहवासी दाखला देणे बंद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असे .

    ही समस्या लक्षात घेऊन व
    भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्शीया जुही यांची भेट घेऊन निवेदन देऊन रहिवासी दाखला नगर परिषद येथून देण्याची मागणी केली होती.