• Advertisement
 • Contact
More

  घुग्घुस शहरातील एटीएम सुरक्षा रक्षका विना

   सुरक्षा रक्षक तैनात करा विवेक बोढे यांची मागणी घुग्घुस शहरातील एटीएम सुरक्षा रक्षका विनाच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
     त्यामुळे भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी येथील एटीएम मध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी केली आहे.
     घुग्घुस शहरात जवळपास आठ ते दहा एटीएम आहे. परंतु येथे कोणतीच सुरक्षा नाही व सुरक्षा रक्षक तैनात राहत नाही.
    काही दिवसापूर्वीच एसीसी सिमेंटनगर येथील बँकेचा एटीएम फोडण्याच्या चोरट्याने प्रयत्न केला तर एका एटीएमच्या काचा फोडण्यात आल्या होत्या.
     त्यामुळे घुग्घुस परिसरातील एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना यात पैसे आहे किंवा नाही याची योग्य माहिती मिळत नाही याचा सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
      भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी बँकांच्या प्रबंधकांनी एटीएम मध्ये सुरक्षा रक्षक तैनात करावे अशी मागणी केली आहे.
  
  
  नौशाद शेख घुग्घुस: प्रतिनिधि सर्च टि, व्ही,