• Advertisement
  • Contact
More

    घुग्घुस येथील उडिया मोहल्ल्यातील रस्त्यावर येणारे नालीचे पाणी साफ करा व नवीन नालीचे बांधकाम करा – आम आदमी पार्टी घुग्घुस शहर अध्यक्ष अमित बोरकर

    अमराई वार्ड क्रं.१ उडिया मोहल्ला येथील समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे घूग्घुस नगरपरिषदेला वारंवार निवेदन देऊन सुद्धा या भागाकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. अमराई वार्ड क्रं.१ उडिया मोहल्ला येथील सोनू शेट्टियार यांच्या घरासमोरील नालीचे घाण पाणी संपूर्ण रस्त्यावर येत आहे तिथून येता जाताना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. नालितील पाणी जाण्याकरिता कुठलाही मार्ग नसल्यामुळे सर्व पाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे तेथील नाली साफ करण्यात यावी व नवीन नालीचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टी घुग्घुस शहर अध्यक्ष अमित बोरकर द्वारा नगरपरिषदेचे प्रशासक यांना करण्यात आली अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
    यावेळी अमित बोरकर शहराध्यक्ष आम आदमी पार्टी घूग्घुस, अभिषेक सपडी उपाध्यक्ष आम आदमी पार्टी, प्रशांत सेनानी युवा अध्यक्ष आम आदमी पार्टी, रवी शांतलावार, विकास खाडे, आशिष पाझारे, सागर बिऱ्हाडे, निखिल कामतवर, सोनू शेट्टीयार आदी उपस्थित होते.