चंद्रपूर :- आज रविवारी 8 ऑगस्ट रोजी गडचांदूर जवळील अमलनाला वेस्टवेयरच्या खोल पाण्यात बुडून विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर निवासी युवक गोलू चट्टे 24 याचा मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी दुपारी 4 वाजता चंद्रपुरातील पठाणपूरा परिसरातील 7 ते 8 युवक हे अमलनाला धरण परिसरात फिरायला गेले होते. या युवकांमध्ये गोलू विनायक चट्टे याचा देखील समावेश होता. शिवाय त्याच्यासोबत एक लहान मुलगा देखील होता. धरणाच्या वेस्टवेयर जवळ पाण्यात मस्ती करताना एक लहान मुलगा पाण्यात वाहून जात असल्याचे बघून त्याला वाचविण्यासाठी गोलू देखील पाण्यात उतरला. त्यामुळे लहान मुलाला तर वाचविण्यात आले. परंतु, खोल पाण्यात बुडून गोलू याचा मृत्यू झाला. माहिती मिळताच गडचांदूर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. शव पोस्टमार्टमसाठी रवाना करण्यात आला. पुढील तपास गडचांदूर पोलिस करीत आहेत.
