• Advertisement
  • Contact
More

    गोंदिया जिल्ह्यातील ताडगाव येथे गॅस लिक झाल्याने सहाजण गंभीर भाजले

    गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोर तालुक्यातील ताडगाव येथील नीता राम वासुदेव पंधरे यांच्या घरी दिनांक 15 जुलै च्या रात्री आठ वाजेच्या दरम्यान गॅसचा हंडा लिक झाल्याने त्यांच्यासह घरील चार जण व एक शेजारी गंभीररित्या भाजले गेले.

    याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 15 जुलै च्या रात्री आठ वाजेच्या सुमारास संपूर्ण स्वयंपाक आटोपल्यानंतर शिळे अन्न गरम करण्यासाठी गॅस पेटविण्याकरिता गेले असता गॅस लीक असल्याने खोलीमध्ये गॅस पसरले होते त्यामुळे अचानक गॅसने पेट घेतला त्यामध्ये नीता राम वासुदेव पंधरे, भागरता वासुदेव पंधरे, प्रकाश वासुदेव पंधरे, प्रभू पंधरे, रसिका पंधरे व शेजारी कवडू महागु बनारसी हे गंभीररीत्या भाजले गेले त्यांना अर्जुनी-मोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले त्यानंतर पुढील उपचारासाठी भंडारा येथे पाठविण्यात आले