• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    गोसीखुर्द प्रकल्प क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा ईशारा

    चंद्रपुर :- गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणामधुन सध्या 160 क्युमेक्स सुरू असलेला विसर्ग आज दि. 22/07/2021 दुपारी 14:00 वाजेपर्यंत 500 क्युमेक्स पर्यंत वाढविण्यात येईल. तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी असे जिल्हा प्रशासनाद्वारे सुचित करण्यात आले आहे.