• Advertisement
  • Contact
More

    ग्राम पंचायत मिंडाला ला महाराष्ट्र विधान मंडळ रोजगार हमी योजना समिती अंतर्गत तपासणी दौरा टीम दाखल

    आज दिनांक 03/09/2021 ला ग्राम पंचायत मिंडाला ला महाराष्ट्र विधान मंडळ रोजगार हमी योजना समिती अंतर्गत तपासणी दौरा टीम दाखल झाली.
    या तपासणी दौरा अंतर्गत ग्राम पंचायतिने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या कामाची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने मामा तलाव खोलीकरण आणि नाला खोलीकरण या कामावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. समिति प्रमुख मा. मनोहर चांद्रिकापुरे आमदार मा नरेंद्र दराडे, मा राजेश पाटील, मा अमोल मिटकरी विधान परिषद आमदार तसेच संबंधित पंचायत समिती अधिकारी उपस्थित होते श्री संजयभाऊ गजपूरे जि.प. सदस्य, श्री विनोदभाऊ नवघडे, पंचायत समिती सदस्य सौ प्रणयाताई गड्डमवार, श्री पुरी साहेब संवर्ग विकास अधिकारी नागभिड, सौ राऊत मॅडम, श्री फतींग साहेब, श्री लाडे साहेब, सौ रामटेके ग्राम सेवक मॅडम श्री गणेश गड्डमवार सरपंच आणि ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते