चंद्रपूर :- चिमूर तालुक्यातील भिसी येथून जवळच असलेल्या आंबेनेरी गावातील ग्राम पंचायत कार्यालयातून 11 जुलैला रात्री अज्ञात व्यक्तीने कुलूप तोडून संगणक, प्रिंटर वायफाय, मशीन आदी साहित्याची चोरी केली. या घटनेची तक्रार सरपंच संदीप दोडके यांनी भिसी पोलिसांत केली आहे. आंबेनेरी ग्राम पंचायतीचे चपराशी विशाल बारेकर हे कार्यालयाची साफसफाई करीत असताना त्यांना लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडले असल्याचे दिसून आले. लगेच त्यांनी याची माहिती सरपंचांना दिली. यानंतर कार्यालयाचा दरवाजा उघडून बघितले असता लेनोवो कंपनीचा 15 हजार रुपयांचा संगणक, प्रिंटर, माऊस, 4 हजाराचा वायफाय असा एकूण 19,400 रुपयांचा माल चोरी झाला आहे. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
