• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  ब्रेकिंग न्यूज बंदूकीचा धाक दाखवून दोन लाख रुपये लुटले

  मूल (अमित राऊत )
  राजोली येथील मुसली यांच्या पेट्रोल पंपावर काल रात्री अज्ञात दरोडेखोरांनी गावठी पिस्तुलचा धाक दाखवीत दोन लाख रुपये लुटून नेल्याची घटना घडली.
  मूल तालुक्यातील राजोली येथील विनोद मुसली यांचे विरव्हा येथे पेट्रोल पंप आहे. काल रात्री आठ वाजता चे दरम्यान दोन युवक पल्सर या दुचाकी वाहनावर बसून पेट्रोल पंपावर आले. पेट्रोल पंपाचे मालक विनोद मुसली यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेले दोन लाख रुपयासह दुचाकीवर बसविले. त्यांच्याकडून पैसे घेऊन, मुसळे यांना विरव्हा जवळ सोडले आणि पैसे घेऊन पसार झाले.
  याची माहिती सिंदेवाही पोलिसांना दिलेली आहे.
  या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. मागील काही दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात अपराधाचे प्रमाण वाढत असून औद्योगिक क्षेत्राकडे असलेल्या अपराधाचे लोन आता शांत असलेल्या मूल, सिंदेवाही तालुक्यातही पसरल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.