• Advertisement
  • Contact
More

    बल्लारपुर तालुक्यातील कोठारी क्षेत्रात गुप्त धनाच्या शोधात टोळी सक्रिय

    बल्लारपूर :- तालुक्यातील कोठारी येथून अवघ्या पाच की मी अंतरावर असलेल्या कवळजी मामा तलावाजवळ पुरातन हनुमान मंदिरा जवळ गुप्तधनाच्या लालसेपोटी अज्ञात लोकांनी तोडफोड करून उत्खनन केल्याची माहिती समोर येत आहे.
    २१ व्या शतकात पण असे प्रकार उघडकीस येत आहे. झटपट श्रिमंत होण्याचा लोभाने अंधश्रद्धैला बळी पडून पुरातन हनूमान मंदिर फोडून तिथे एक मिटरचा खडा करून गुप्तधन काढण्याचा अघोरी प्रताप समोर आले आहे. या प्रकारामुळे परीसरात शेतकरी व भावीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
    तरीही या प्रकरणाची फिर्याद अजूनही कुणी पोलिस स्टेशन ला दिली नाही. करीता या प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलिस प्रशासन यांने या समोर असे अंधश्रध्देच्या आहारी कूणीही जाता कामा नये यासाठी जनजागृती करावी. व हे जे कूणी कृत केले आहे. त्याचावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.