• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  आंतरजातीय विवाह, दिव्यांग विवाहित जोडप्यांना जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या हस्ते अर्थसहाय्य वाटप व स्वागत समारंभ संपन्न

  चंद्रपुर – २२ जुलै २०२१, गुरुवार… जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने आज कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृहामध्ये आंतरजातीय विवाह, दिव्यांग विवाहित जोडप्यांना अर्थसहाय्य वाटप व स्वागत समारंभ पार पडला.
  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. नागराज गेडाम समाज कल्याण सभापती, सौ. रोशनी खान महिला व बाल कल्याण सभापती, श्री. मरसकोल्हे सदस्य जिल्हा परिषद, सौ. स्मिता पारखी सदस्या जिल्हा परिषद, सौ. लता पिसे सभापती पंचायत समिती चिमूर, सौ. मिताली शेट्टी मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. श्याम वाखर्डे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. सुरेश पेंदाम जिल्हा समाज कल्याण अधिकारी इत्यादी उपस्थित होते.
  आंतरजातीय विवाह जोडप्यांना ५०००० रुपये, दिव्यांग विवाहित जोडप्यांना ३०००० रुपये सन २०१९-२०२० मध्ये २२८ लाभार्थ्यांना आणि २०२०-२०२१ मध्ये २७७ लाभार्थ्यांना धनादेश चे वाटप करण्यात आले. कोरोना ची परिस्थिती लक्षात घेता यावर्षी पंचायत समिती स्तरावर छोटा कार्यक्रम आयोजित करून धनादेश चे वाटप करण्यात येणार आहे.
  यावेळी उपस्थित जोडप्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सौ. संध्या गुरनुले यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. सर्वांनी इतका पाऊस येत असताना सुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्यामुळे कार्यक्रमाला शोभा आली. आधीच्या काळात समाजामध्ये अनेक आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. आता परिस्तिथी बदलली. दिव्यांगाना सुद्धा त्रास सहन करावा लागत होता. कुटुंबामध्ये सुद्धा विरोध होत होता. पण या सर्व गोष्टीला न घाबरता सर्वांनी आपल्या संसाराचा गाडा उत्कृष्ट पणे चालवला आहे.
  यालाच थोडी मदत म्हणून जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने सर्व जोडप्यांना धनादेश वाटप करण्यात आला.
  यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुरेश पेंदाम जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सूत्रसंचालन सौ. एकता पित्तुलवार, आभार श्री. अजय वैरागडे यांनी केले.