• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  विश्व हिपाटायटिस दिवस निमित्य रेड लाइट एरिया मध्ये हिपाटायटिस आणि कॅन्सर पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन: टाटा ट्रस्टचा उपक्रम

  चंद्रपुर :- टाटा ट्रस्ट तसेच संबोधन फाउंडेशन व रोल संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व हिपाटायटिस दिवस निमित्य चंद्रपूर स्थित महाकाली नगर मधील रेड लाइट एरियातील महिलांसाठी हिपाटायटिस आणि कॅन्सर पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

  या शिबिरात 40 महिलांची कर्कराेग, डायबेटिस, बीपी आणि हिपाटायटिस ची तपासणी करण्यात आली. यात पाच संशयित रुग्ण आढळून आले आहेत.

  उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालय चे साखरकर साहेब तसेच संबोधन ट्रस्ट चे राज काचोळे उपस्थित होते. टाटा ट्रस्टचे जिल्हा व्यवस्थापक डॉक्टर आशिष बारब्दे व टाटा ट्रस्ट ची संपूर्ण टीम यांचे मार्गदर्शनात सदर उपक्रम यशस्वीरीत्या पुर्ण झाला.

  या वेळी डॉक्टर बारब्दे यांनी स्तन व इतर कर्कराेगाची कारणे, लक्षणे, निदान व उपचार पद्धती, हा आजार हाेऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, या आजाराच्या तिसऱ्या व चाैथ्या टप्प्यातील रुग्णाची अवस्था उपचार करण्यात येणाऱ्या अडचणी या महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात खर्रा व तंबाखू खाण्याचे प्रमाण वाढल्याने तोंडाचा कर्कराेग बळावत असल्याची माहिती डॉ. तुषार रामटेके यांनी दिली.

  या वेळी हिपाटायटिस बी आणी सी आजार कसा पसरतो आणि योग्य उपचार या संबंधी अर्पणा यांनी महिलांना मार्गदर्शन केले.