• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    30 बेडच्या घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाच्या बिल्डिंग वर्कचे टेंडर निघाले। सामाजिक कार्यकर्ता इबादुल सिद्दीकी यांच्या प्रयत्नास यश

    सामाजिक कार्यकर्ता इबादुल सिद्दीकी यांच्या प्रयत्नास यश

    घुग्घुस येथील 30 बेडच्या ग्रामीण रुग्णालयाच्या बिल्डिंग वर्कचे पिडब्लूडी ने टेंडर काढले आहे. हा टेंडर 8 करोड 7 लाख 91 हजार 481 रुपयाचा आहे. 30 बेडच्या घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाचे काम लवकर सुरु होणार आहे. 9 जून 2014 ला तत्कालीन महाराष्ट्र सरकारने 30 बेडचे घुग्घुस ग्रामीण रुग्णालयास मंजुरी दिली होती. 24 ऑक्टोबर 2018 ला महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाच्या बिल्डिंग बांधकामासाठी 11 करोड 17 लाख 10 हजार रुपये मंजूर केले. सन 2005 पासून सामाजिक कार्यकर्ता इबादूल सिद्दीकीने वारंवार प्रयत्न केले. पीडब्लूडी चंद्रपूर अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे उप कार्यकारी अभियंता संजय जाधव उप विभागीय अभियंता चंद्रपूर या अधिकाऱ्यांनी घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाचा टेंडर काढला आहे. सामाजिक कार्यकर्ता इबादूल सिद्दीकी यांच्या प्रयत्नाने लवकरच घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाच्या 30 बेडच्या बिल्डिंगचे काम सुरु होणार आहे.