• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    शहरातील 12 हॉटेल्सवर कारवाई

    चंद्रपूर :- नियमांचे उल्लंघन करीत हॉटेल्स सुरू ठेवणा-या 12 हॉटेल्सवर रविवारी रामनगर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कारवाई केली.
    सर्व उपहारगृहे, रेस्टारंट सोमवारी ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के आसनक्षमतेने डायनिंगसाठी कोरोना वर्तणुकविषयक नियमांचे पालन करून सुरू ठेवावे, दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत केवळ पार्सल, घरपोच सुविधा द्यावी, शनिवारी व रविवारी पूर्णपणे बंद ठेवावे, केवळ पार्सळ व घरपोच सुविधा द्यावी, असे निर्देश प्रशासनाने दिले असताना काही हॉटेल्स 4 नंतर ही सुरु दिसली अश्या 12 होटल्स वर कार्यवाही करण्यात आली आहे.