• Advertisement
 • Contact
More

  वाघाच्या हल्ल्यात 20 शेळ्या ठार

  येनोली येथील घटना
  तळोधी बाळापूर वन उद्यानाअंतर्गत येनोली बिट, क्रमांक 65 मध्ये, 4 महिन्याच्या अगोदर सरपण आणण्यासाठी गेलेल्या इसमाला याच बीटामध्ये मध्ये वाघाने ठार केले होते. आणी ही या परिसरात दुसरी घटना होय. वाघाने 20 शेळ्या ठार केल्याची घटना सोमवारच्या संध्याकाळी घडली.
  त्यामुळे शेळीपालन यांचे 1 लाख पर्यंत नुकसान झालेले आहेत.
  जंगलाच्या दिशेने चराईसाठी, सारणगढ तलावाच्या दिशेने चरायला नेले असता काही शेळ्या भटकल्या, काही जंगलात दिशेने गेल्या त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे सकाळी, जेव्हा शेळी पाळणारे पुन्हा शेळ्यांच्या शोधात जंगलात गेले, तेव्हा त्यांना जंगलात 16 शेळ्या मृतावस्थेत आढळल्या. काही शेळ्यांचे अवशेष सापडले आणि काही शेळ्या वाघाने खाऊन पिटाळल्या. हा वाघ भटक्या शेळ्या मारत असल्याचा संशय आहे, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पगमार्कच्या कल्पनेवर आधारित आहेत.
  . घटनास्थळी गोविंदपूरचे क्षेत्र सहाय्यक आर. गायकवाड, वनरक्षक एस. गौरकर, त्यांनी पंचनामा करून कॅमेरे बसवले आहेत.