चंद्रपुर :- भिवापूर प्रभाग 14 मिलिंद नगर पठाणपूरा वॉर्ड चंद्रपूर इथे जवळपास 1986 मध्ये बांधलेले सरकारी शौचालय अतिशय जीर्ण अवस्थेत आहे व त्या शौचालयाचा कोणी वापर करीत नाही. उघडे असलेले चेंबर, बसण्याची सीट तुटून, पाळीव प्राण्यांचा वावर, दुर्गंधी, मच्छरांचा प्रादुर्भाव खूप जोरात वाढत आहे.
डेंगू व मलेरिया चे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे त्या शौचालयाला लवकरात लवकर तोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
BRSP चे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड डॉ सुरेश माने सर यांच्या मार्गदर्शनाने
BRSP युवा आघाडी जिल्हा चंद्रपूर तर्फे आयुक्त महानगरपालिका चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.
स्वच्छता अधिकारी (सॅनिटरी इन्स्पेक्टर) पोतनूरवार सर यांना या बाबत माहिती दिली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन स्वतः त्या शौचालयाची पाहणी केली व बांधकाम विभागाला सूचित केले व लवकरात लवकर त्या शौचालयाला पाडण्यात येईल असे आश्वासन दिले.
निवेदन देताना बहुजन रिपब्लिकन सोशियालिस्ट पार्टी चे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष मोंटो मानकर सोबत अंकुश खरतड, आदित्य ताकसांडे, विक्रांत वाघमारे, क्रोशांत नळे आदी उपस्थित होते.