• Advertisement
  • Contact
More

    ओमटी कारखान्यातील कॉपर चोरी प्रकरणातील टाटा सुमो बदलली. एका भंगार चोरास अटक तर मुख्यसूत्रधारासह तीन आरोपी फरारच

    एका भंगार चोरास अटक तर मुख्यसूत्रधारासह तीन आरोपी फरारच

    घुग्घुस :- दिनांक 26 जुलै रोजी रात्री 11 वाजता दरम्यान ओमटी स्टील प्रा.लि. सि-4 एमआयडीसी ग्रोथ सेंटर ताडाळी येथील बंद कारखाण्यात विद्युत ट्रान्सफार्मर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु सुरक्षा राक्षकांनी आरडा ओरडा केल्याने भंगार चोरांनी पळ काढला. फिर्यादी धनंजय विद्यानंद चौबे (39) रा.चंद्रपूर काटा इन्चार्ज हे सकाळी कंपनीत गेले असता ट्रान्सफार्मरचे ऑइल व कापर साहित्य खाली पडलेले दिसले 13 ते 15 लाखाचे नुकसान झाल्याने त्यांनी पडोली पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली तक्रारी वरून कलम 379,511 गुन्हा दाखल करण्यात आला. घुग्घुस येथील भंगार चोर आरोपी दानिश शब्बीर कुरेशी (23) रा. बँक ऑफ इंडिया मागे घुग्घुस यास अटक केली. न्यायालयात हजार केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आणखी तीन आरोपी फरारच आहेत. पोलिसांनी कापर साहित्य 45,000 हजार एक टाटा सुमो किंमत 1 लाख रुपये असा एकूण 1 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त केला होता परंतु जप्त केलेली ही टाटा सुमो भंगार अवस्थेची असल्याने तिला टोचन करून जप्तीत पोलिसांनी दाखविली. चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली टाटा सुमो क्र एमएच 12 डीएम 5252 असून तिला आर्थिक देवाण घेवाणी तुन जप्तीत दाखविण्यात आली नाही त्यामुळे हे चोरीचे प्रकरण दाबण्यात येत आहे अशी नागरिकात चर्चा आहे.