• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  नवनिर्माण होत असलेल्या शासकिय मेडिकल कॉलेजचे बांधकाम कंत्राटदारांच्या हुकुमशाही विरोधात प्रहारचे आंदोलन…

  चंद्रपुर :- नवनिर्माण होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम करणारे कंत्राटदार शापुर्जी पालोंजी तसेच कामगार पुरवठा करणारी एजंसी आर. सी. जैन यांचे कंत्राटाद्वारे येथे काम सुरु आहे.
  सदर दोन्ही कंत्राटदारांकडे 500 ते 600 कामगार कंत्राटी पद्धतिने कार्यरत आहेत परंतु प्रशासन कामगारांना ओ.टी.चे पैसे न देने व मागीतले तर कामावरून कमी करने, लंच ब्रेक चा 1 तास कपात करुन रोजी देने, स्थानीक कामगारांना डावलून परराज्यातील कामगार कामावर घेणे, पगारवाढ व इतर भत्ते वाढ मागीतले तर कामा वरुन कमी करने असे प्रकार सुरु आहेत.
  अश्या हुकुमशाही पद्धतीने 17-18 कामगारांना काढण्यात आले.
  जिल्हाधिकारी व वैधकीय अधीक्षक यांना भेटून सुद्धा तोड़गा निघाला नसल्याने आज प्रहार जनशक्ति पक्षा चे महेश हजारे यांच्या नेतृत्वात नवनिर्माण वैधकीय महाविद्यालयासमोर घोषणा बाजी करत आंदोलन करण्यात आले.
  यावेळी सचिन बांबोळे, सुमित दुधे, अमोल लांडगे, प्रेम पोयाला आदी प्रहार सेवक उपस्थित होते.