• Advertisement
 • Contact
More

  घरी शौचालय नसल्याने तीन महिला ग्रा.पं. सदस्यांचे सदसत्व रद्द

  व्यंकटापूर येथील तीन महिला ग्रापं सदस्यांचे सदसत्व रद्द

  प्रत्येक गाव हागणदारी मुक्त व निर्मल ग्राम व्हावे यासाठी शासन संपूर्ण स्वच्छता अभियान राबवित आहे. ग्रामपंचायतच्या प्रत्येक सदस्याकडे शौचालय असावे, असा कठोर नियम शासनाने घेतला असतांनाही गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील व्यंकटापूर येथील तीन ग्रापं सदस्यांनी आपल्या घरी शौचालय न बांधल्याने जिल्हाधिकारी यांनी सदस्यत्व रद्द करीत त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. तिरुपतक्का संजीवकुमार मेडी, शेफाली शंकर गड्डी, नागमणी लालू सडमेक असे सदस्यत्व रद्द झालेल्या महिलांची नावे आहेत.
  जानेवारी 2021 मध्ये ग्रामपंचायत सार्वत्रीक निवडणूक झाली. यात व्यंकटापूर ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी तिरुपतक्का मेडी, शेफाली गड्डी व नागमणी सडमेक या महिला निवडून आल्या होत्या. दरम्यान अर्जदार अजय बापू आत्राम यांनी सदर सदस्य निवडून आले तेव्हा त्यांचेकडे शौचालय नव्हते वा शौचालयाचा वापर करीत नव्हते. त्यामुळे त्यांचे सदस्य पदावरुन अनर्ह करावे, अशी मागणी तक्रारीतून केली होती. याअंतर्गत सिरोंचा पंस गटविकास अधिकारी यांनी चौकशी केली असता तिरुपतक्का मेडी यांच्याकडे शौचालय नसल्यचे तर शेफाली गड्डी व नागमणी सडमेक यांचे शौचालय वापरायोग्य नसल्याचे अहवालात नमूद केले.
  अर्जदार व गैरअर्जदारांचा युक्तिवाद ऐकूण घेत जिल्हाधिकारी यांनी 5 ऑगस्टच्या सुनावणी अंती आदेश पारित करीत सदर तिन्ही महिला ग्रामपंचायत सदस्याअपात्र ठरत असल्याचे घोषित करीत त्यांचे सदस्यत्व रद्द केले. यामुळे व्यंकटापूर ग्रामपंचायत प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.