• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    मनपाच्या तिन्ही झोन सभापतिंची निवड दोन भाजपा तर 1 काँग्रेस

    चंद्रपूर, ता.५ : चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या प्रभाग समिती क्रमांक एक, दोन आणि तीनच्या सभापतिपदाच्या निवडीसाठी ५ ऑगस्ट रोजी मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई सभागृहात पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेत, तिन्ही प्रभागासाठी ४ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती यात ₹ प्रभाग समिती क्रमांक एक करिता सभापतिपदी छबूताई मनोज वैरागडे यांची अविरोध निवड करण्यात आली तर प्रभाग समिती क्रमांक दोनच्या सभापतिपदी खुशबू अंकुश चौधरी यांचीही अविरोध निवड करण्यात आली.
    प्रभाग समिती तीनमधून भारतीय जनता पक्षाचे सोपान गेनभाऊ वायकर व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अली अहमद मन्सूर आदींनी नामांकन दाखल केले होते.
    दोन्ही उमेदवारांना समान 10 मते मिळाली त्यावर सोङत काढण्यात आली यात अली अहमद मन्सूर विजयी झाले.