• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    वडगाव प्रभागातील युवक युवतींचा राष्ट्रवादीत प्रवेश

    चंद्रपुर :- आज चंद्रपूर शहरातील वडगाव प्रभाग येथील महिलांनी व युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास करत जाहीर प्रवेश केला. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढत असून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच्या हितासाठी अजून जोमाने काम करताना दिसेल व आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकट्याने धुरळा करताना दिसेल.

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चंद्रपूर मनपा नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, डी.के.अरीकर, युवक शहराध्यक्ष प्रदीप रत्नपारखी, महिला शहराध्यक्ष ज्योती रंगारी, सतीश मांडवकर, राहुल देवताळे, कुणाल ठेंगरे, रोहन बांदूरकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.