• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    कोंडय्या महाराज देवस्थानातील दानपेटी फोडली पाचव्यांदा झाली चोरी

    चोराला पकडण्यात पोलीसांना यश

    चंद्रपुर :- महाराष्ट्र-तेलंगणातील भाविकांचे आराध्य देवस्थान असलेल्या कोंडय्या महाराज मंदीरात चोरीचे सत्र सूरू होते.देवस्थानातील दानपेटी फोडून तेथिल रोख रक्कम लंपास केली जायची.अश्यात शनिवारचा पहाटेला चोराने सिसिटीव्हीला पेंट फासून दानपेटी फोडली अन रक्कम लंपास केली.मात्र काही तासातच धाबा पोलीसांना चोराला पकडण्यात यश आले.

    महाराष्ट्र-तेलंगणातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री संत परमहंस कोंडय्या महाराज यांचे देवस्थान धाबा येथे आहे.मागील वर्षभरात या देवस्थानातील दानपेटी चारदा फोडण्यात आली.अश्यात शनिवारला पहाटे सात वाजता मंदीराचे पुजारी शेगमवार महाराज महासमाधीची पुजा करण्यासाठी गेले असता त्यांना मंदीरात असलेल्या सिसिटीव्हीवर पेंट फासलेला दिसला.दानपेटी फोडलेल्या अवस्थेत आढळून आली.शेगमवार यांनी देवस्थान संस्थेचे अध्यक्ष अमर बोडलावार,सचिव किशोर अगस्ती यांना घटनेची माहीती दिली.संस्थानचा पदाधिकार्यांनी धाबा उप पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.हा प्रकार पाचव्यांदा घडला असल्याने धाबा पोलीसांनी चौकशीचे सूत्र जलद गतीने हलविले.अवघ्या तासाभरात आरोपीला पकडण्यात पोलीसांना यश आले आहे.आरोपी धाबा गावातीलच असून सूरज दुर्गे असे आरोपीचे नाव आहे.तो धाबा येथिल आपल्या आजीकडे राहतो आहे.दानपेटीतील दोन हजाराची रक्कम आरोपीने लंपास केली.माझे वडीलांना गंभीर आजार झाला आहे.उपचारासाठी पैसे नसल्याने चोरी केल्याचे आरोपीने बयानात सांगितले आहे.पुढील तपास धाबा ठाणेदार सूशिल धोपटे करीत आहेत.