• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  डॉ. आंबेडकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आभासी परिषद संपन्न

  धम्मशील शेंडे

  चंद्रपुर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, चंद्रपूर संचालित डॉ. आंबेडकर ला महाविद्यालय, चंद्रपूर येथे दिनांक २८ जुलै २०२१ सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ‘आंतरविद्याशाखीय सामाजिक अर्थशास्त्रीय पर्यावरणातील आविष्कार व कायम स्वरूपी जैव वैविधतेचे शाश्वत विकासाच्या माध्यमाने जतन’ या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय आभासी परिषद संपन्न झाली. सदर परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, चंद्रपूर चे अध्यक्ष मान, अरूण घोटेकर होते. आपल्या भाषणातून ते म्हणाले की, बदलत्या सामाजिक, आर्थिक पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वांगिण विकासाच्या माध्यमातून जैव वैविधतेचे संगोपन करण्याची या परिषदेच्या अनुषंगाने प्रेरणा मिळेल. या परिषदेचे उद्घाटन डॉ. श्रीनिवास वरखेडी कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटनपर भाषणात ते म्हणाले की, चंद्रपूर गडचिरोली जिल्हयातील नैसर्गिक साधन संपतीचे जतन करण्याच्या दृष्टीने संशोधन व्हायला पाहिजे. याप्रसंगी डॉ. स्टीवेन मॅन्चेस्टर युनिव्हरसिटी ऑफ फ्लोरिडा (अमेरिका) यांनी आपल्या बीजभाषणात भारतात जैविक संसाधन भरघोष प्रमाणात उपलब्ध आहे. भारतीयांनी त्याचा वापर मानवी विकासासाठी करावा, असे आभासी पध्दतीने मत प्रतिपादन केले. याप्रसंगी संयोजन समितीचे सचिव डॉ. अमृत लाजे उपस्थित होते.

  सदर कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर यांनी आतरराष्ट्रीय परिषदेचा उद्देश स्पष्ट करून जैव विविधता व सामाजिक अर्थशास्त्रीय पर्यावरणातील संशोधनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याकरिता आवाहन केले तसेच या क्षेत्रात संशोधन करणाऱ्याला मोठा वाव आहे असे मत व्यक्त केले.

  कार्यक्रमाचे सूत्र संचालन इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. भालचंद्र अतकुलवार यांनी केले. व आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. संजय बेले यांनी केले.
  या परिषदेत झालेल्या पहिल्या तांत्रिक सत्रातील अध्यक्ष डॉ रश्मि श्रीवास्तव, लखनऊ आणि प्रमुख मार्गदर्शक प्रो. अश्विनीकुमार श्रीवास्तव, माजी शास्त्रज्ञ इन्सिटयुट ऑफ पेलिओ बॉटनी लखनऊ, दुसऱ्या सत्रातील अध्यक्ष डॉ. निखील कानूंगो शासकीय स्वयंचालित स्तानकोत्तर विद्यापीठ, छिंदवाडा, प्रमुख मार्गदर्शक डॉ. आशा गुप्ता, मणीपूर युनिव्हरसिटी, इन्फाल, तिसऱ्या सत्रातील प्रमुखः मार्गदर्शक डॉ. सी. मनोहराचार्य उस्मानिया विद्यापीठ, हैद्राबाद, अध्यक्ष डॉ. डी. के. कापगते वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख, जे. एम. पटेल कॉलेज, भंडारा, चौथ्या सत्रातील मार्गदर्शक डॉ. एस. डी. बोंडे, माजी शास्त्रज्ञ, आगरकर संशोधन संस्था, पुणे, अध्यक्ष डॉ. सुरेन्द्र माणिक संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती, पाचव्या सत्रातील डॉ. धनंजय मोहावे माजी शास्त्रज्ञ जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, नागपूर, अध्यक्ष डॉ. सुषमा बोरकर, विज्ञानसंस्था, नागपूर यांनी आभासी पध्दतीने सहभाग दर्शवून मार्गदर्शन केले. यानंतरच्या सत्रात संशोधक विद्यार्थ्यांनी संशोधन पेपरचे वाचन केले.

  समोरोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य अँड. राहुल घोटेकर होते. ते आपल्या भाषणात म्हणाले की, पर्यावरणपूरक विकास साधणे ही काळाची गरज आहे. प्रमुख अतिथी संस्थेचे उपाध्यक्ष मान, अशोक घोटेकर म्हणाले की, निसर्गाशी समतोल साधणे मनुष्य जीवनातील अंतीम ध्येय आहे. याप्रसंगी डॉ. डी. के. कापगते भंडारा व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर व उपप्राचार्य डॉ. संजय बेले उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन डॉ. देवराव पिंपळशेंडे यांनी केले व आभार प्रदर्शन संयोजन समितीचे सचिव डॉ. अमृत लाजे यांनी केले. सदर आभासी परिषदेला देश विदेशातील प्राध्यापक, पर्यावरण प्रेमी व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.