• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    जिल्हा कारागृहातील कैद्याचा कँसर ने मृत्यू

    चंद्रपुर :- चार वर्षांपासून चंद्रपूर जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा कँसर ने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.रामराव इल्ला असे शिक्षा भोगत असलेल्या मृत कैद्याचे नाव आहे.जिल्हा कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगड राज्यातील भोमाईपठण तालुक्यातील गोटाईगुडा येथील रामराव इल्ला याने गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा पोचमपल्ली येथील एका इसमाची ६ जानेवारी २०१७ मध्ये हत्या केली होती.त्यानंतर गडचिरोली च्या सिरोंचा पोलिसांनी रामराव इल्ला याला अटक करून गडचिरोलीच्या न्यायालयात हजर केले.आरोपी रामराव इल्ला याला न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली होती.त्यानंतर आरोपीची चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.मात्र मागील दोन वर्षांपासून त्याला कँसर या रोगाने ग्रासले असल्याने त्याच्यावर नागपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दीड वर्षांपासून उपचार सुरु होते.मात्र काल रात्री अचानक त्याची प्रकृती खराब झाली.तसेच त्याला श्वास घेण्यास अडचण निर्माण होत असल्याने त्याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.