• Advertisement
  • Contact
More

    कोळसा खाणींमध्ये स्थानिकांना डावलून परप्रांतीय ट्रकांचा भरणा, नायगाव चेकपोस्टजवळ स्थानिक ट्रक चालकांचे आंदोलन

    वेकोलिच्या वणी क्षेत्रातील नायगाव, मुगोली, पैनगंगा या कोळसा खाणींमध्ये रोड सेलच्या डीओमध्ये परप्रांतीय ट्रान्सपोर्टर टिप्पर लावले आहेत. पण, स्थानिक पल्ला गाडीच्या ट्रक चालक-मालकांना डावलल्या जात आहे. स्थानिकांचे ट्रक लावण्यात यावे, या मागणीसाठी गुरूवार, 16 सप्टेंबर रोजी नायगाव कोळसा खाणीच्या चेकपोस्टजवळ ट्रक चालक-मालकांनी धरणे आंदोलन करून वेकोलि प्रशासनाचा निषेध नोंदवला. सप्रा, चड्डा, फुलको, भाटिया, गुप्ता अश्या मोठया ट्रान्सपोर्ट कंपण्यांना काम देण्यात आले आहे. या कंपण्या स्थानिक ट्रक चालक मालकांच्या गाड्या लावत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
    यावेळी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष रवीश सिंग, यंग चांदा ब्रिगेड चालक मालक संघटनेचे सय्यद अबरार, नकोडा माजी उपसरपंच हनीफ मोहम्मद, आदिंची उपस्थिती होती.