• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  स्थानिकांना उद्योगात प्राधान्य द्यावे _स्थानिक कामगारांच्या मुद्यावर प्रहार आक्रमक

  स्थानिक कामगारांच्या मुद्यावर प्रहार आक्रमक
  चंद्रपूर :- वरोरा तालुक्याची ओळख औद्योगिक शहर म्हणून आहे. शहराच्या आजूबाजूला वर्धा पॉवर तसेच जी.एम.आर अश्या कंपन्या आहेत. परंतु या कंपनीत स्थानिक रोजगारांना डावलण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिकांच्या मुद्दयावर आक्रमक होत प्रहार जनशक्ती पार्टीने आक्रमक होत स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा उपविभागीय अधिका-यांना एका निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
  स्थानिकांना उद्योगांमध्ये रोजगार मिळायला हवा. पण, या कंपन्यांमध्ये बाहेर राज्यातील लोकांना रोजगार देण्यात येते. मात्र, स्थानिक बेरोजगारांना डावलण्यात येते आहे. स्थानिक रोजगार हे रोजगारापासून वंचित आहेत. याच मुद्यावर प्रहार आक्रमक झालेली असून प्रहार जनशक्ती पक्षाकडून शुक्रवारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाची दखल घेतली नाही, लवकरच तीव्र आंदोलन करू, असा इशारा प्रहारचे माजी शेतकरी तालुका प्रमुख किशोर डुकरे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.
  निवेदन देताना किशोर डुकरे, हर्षल ढोके, पिंटू वासेकर, राहुल देठे, सौरभ काकडे, निखिल पाटील, स्नेहल देवतळे, अमोल पेंदोर, अजय झाडे, वैभव आसुटकर तसेच असंख्य बेरोजगार उपस्थित होते.